*पर्यटन वाढीसाठी सामंजस्य करार*

119

*पर्यटन वाढीसाठी सामंजस्य करार*

 

गडचिरोली, दि.18 ऑगस्ट ; जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासन (जिल्हा परिवर्तन समिती) आणि सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत नाईट कॅम्पिंग, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम, ट्रायबल व इको-टुरिझम, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक निसर्ग शिबिरे अशा उपक्रमांची अंमलबजावणी होणार आहे.

 

मुतनुर, टिपागड, चपराळा अभयारण्य, महादेवगड यांसह विविध पर्यटन स्थळांवर कॅम्पिंग, ट्रेकिंग, निसर्गभ्रमण, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आणि होमस्टे प्रकल्प राबवले जातील. या उपक्रमांतून स्थानिक युवकांना गाईड, प्रशिक्षक, होमस्टे व्यवस्थापन तसेच महिलांना हस्तकला व स्वयंपाक विक्रीद्वारे रोजगार मिळणार आहे.

 

पर्यटनाच्या माध्यमातून गडचिरोलीचा सकारात्मक चेहरा पुढे आणण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.