Home Breaking News साहित्य अकादमीच्या वतीने चांदाळा येथे ग्रामालोक कार्यक्रमाचे आयोजन

साहित्य अकादमीच्या वतीने चांदाळा येथे ग्रामालोक कार्यक्रमाचे आयोजन

143

साहित्य अकादमीच्या वतीने चांदाळा येथे ग्रामालोक कार्यक्रमाचे आयोजन

 

नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीने चांदाळा येथे ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा, ता. जि. गडचिरोली येथे आयोजित या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील नाटककार आणि आदिवासी साहित्यिक आपले सादरीकरण करणार आहेत.

 

ग्रामीण परिसरातील लोककला, लोकजीवन आणि साहित्य यांना व्यासपीठ मिळावे या साठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे ग्रामीण भागात आयोजन केले जात असते.

 

चांदाळा येथील ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध लेखक आणि कलावंत नवरगाव येथील प्राचार्य सदानंद बोरकर भूषविणार आहेत. तसेच गडचिरोली येथील सुप्रसिद्ध नाटककार श्री. चुडाराम बल्हारपुरे आणि एरंडी ता. कुरखेडा नाटककार श्री. विश्वंभर गहाणे आपल्या नाट्यनिर्मितीचे अनुभव कथन करणार आहेत.

 

तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदिवासी कवयित्री व कार्यकर्त्या श्रीमती कुसुम अलाम आदिवासी साहित्य व संस्कृतीबद्दल मार्गदर्शन करणार असून, पुराडा येथील लेखिका श्रीमती संगीता ठलाल या झाडीपट्टीतील रानभाजी व वनौषधीबद्दल आपले अनुभव कथन करणार आहेत.

 

या कार्यक्रमाला साहित्य अकादमी, नवी दिल्लीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित राहणार असून श्रीमती यशोधरा उसेंडी, मुख्याध्यापिका, माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा या आभार प्रदर्शन करणार आहेत. नागरिकांनी

 

या ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाला उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन संयोजक श्री. सतीश पवार यांनी केले आहे. 00

 

संपर्क श्री. सतीश पवार: 94207 54575

Don`t copy text!