चनकाईनगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ताणापोळा उत्साहात साजरा।
एकता गणेश मंडळ यांच्या तर्फे तानापोळ्याचे आयोजन
भाजपा शहर महामंञी निखिल चरडे व प्रमूख मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना वैयक्तिक बक्षीस वितरण
दिं 23/08/2025
गडचिरोली: स्थानिक चनकाईनगर येथे एकता गणेश मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ताणापोळा आयोजन करण्यात आले.
बालगोपालांनी नंदिबैल एकञीकरण व सजवून एकञ ठिकाणी येऊन ताणापोळा साजरा करण्यात आला.
चंद्रयान, शेतकरी आत्महत्या,भ्रष्टाचार, कचरा व्यवस्थापन, कालीमाता, वाढते अपघात या विषयावरील प्रतिकृतींनी महोत्सवाला लाभले.
कार्यक्रमाची सुरूवात हर हर महादेव च्या गजरात पुजन करुन आरती करण्यात आली.
नंदिबैलाचे निरिक्षण करुन प्रत्येकी बालगोपालांना एकता गणेश मंडळाच्या मान्यवरांनकडून बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम बक्षीस प्रोत्साहन बैल सजावट, , थिम,स्लोगन ,ट्रॅफिक पोलिस,उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या राजलक्ष्मी पतरंगे सायकल भाजपा शहर महामंत्री निखिल चरडे यांच्या हस्ते देण्यात आले.
द्वितीय बक्षीस प्रोत्साहन सायकल स्वरांग आकेवार याला विजय गोरडवार यांच्या हस्ते देण्यात आले.
तृतीय बक्षीस प्रोत्साहन सायकल अन्ती कुंभारे , मोहित नवलाखे यांना प्रफुल आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आले
चतुर्थ बक्षीस प्रोत्साहन सायकल संकेत भांडेकर याला भाजपा शहर महामंञी सागर सोनटक्के यांच्या हस्ते देण्यात आले.
चनकाईनगर येथिल एकता गणेश मंडळचे निखिल चरडे,विजय गोरडवार,प्रफुल आंबोरकर,सागर सोनटक्के, विजय कुनघाडकर, सदाशिव नैताम,आशिष सातपुते,शुभम,पून्नमवार,अजय भांडेकर, सागल तूपट व बालगोपाल समत्स नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते






