*!चामोर्शी शहरात तान्हा पोळा उत्सव हर्षउल्हासाने साजरा करण्यात आला!*
*!शेकडो नागरिकांचे उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे आयोजित तान्हा पोळा उत्सवात 180 बालगोपालांचा सहभाग!*
चामोर्शी, दि. 23 ऑगस्ट 2025 :
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार चौक नगरपंचायतीच्या पटांगणात चामोर्शी शहरात भव्य तान्हा पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. परंपरा कायम ठेवत यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ आईचवार,न.पं. चामोर्शी सभापती सौ.सोनाली ताई पिपरे, नगरसेविका प्रेमाताई आईचवार तसेच मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या पारंपरिक तान्हा पोळ्याच्या सोहळा गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ, देवराव होळी यांनी अध्यक्षपद भूषवून उपस्थित राहून बालगोपालांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या.
मा.खा. डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ, देवराव होळी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले तान्हा पोळा व बैल पोळा हा उत्सव करणे आपली संस्कृती आहे. या निमित्ताने आपण सर्वधर्म समभाव जागृत करत एकत्र येतोय व एकोपा निर्माण होतो. आज बालगोपालांनी दाखवलेली सर्जनशीलता, छोट्या नंदीबैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून मन भरून आलं. आपल्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमातून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतात.
या सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून माजी आमदार डॉ, देवराव होळी यांनी आयोजकांना स्वयम प्रेरनेने आपुलकीने काही रक्कम भेट दिली!
पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत सांगितले
“आपली परंपरा, आपला सण – याचं जतन व संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे. बालगोपालांचा आनंद असाच फुलत राहो, शेतकरी बांधवांच्या आयुष्यात समृद्धी नांदो.”असे प्रतिपादन माजी खासदार अशोक नेते व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले.
यावेळी उद्घाटक मिलिंद भाऊ नरोटे यांनी सुद्धा उपस्थिताना मार्गदर्शन केले व बालगोपालांचे उत्साहवर्धन केले,
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, उदघाटक गडचिरोली विधानसभेचे आमदार उदघाटक डॉ. मिलिंद जी नरोटे, प्रा,किशोर ओल्लावार सर, प्रतिष्ठित नागरिक कवीश्वरजी आईचंवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा रमेशजी बारसागडे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्षा नगरसेविका रोशनीताई वरघंटे,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, यशवंत त्रिकांडे, राहुल पालारपवार, बक्षीसचे प्रायोजक रितेश पालारपवार, प्रणव आईचंवार, प्रफुल भांडेकर, महिला बालकल्याण सभापती सोनाली ताई पीपरे, नगरसेविका प्रेमाताई आईचंवार उपस्थित होते. या स्पर्धेतील अ गटातील प्रथम बक्षीस शार्वीक शातलवार यांना मिळाला द्वितीय बक्षीस अविशिका शेट्टे यांना तृतीय बक्षीस आर्य भुरसे चतुर्थ बक्षीस आभारे,यांना मिळाले
ब गटातील प्रथम बक्षीस राजवीर चलकलवार, द्वितीय बक्षीस सत्यम ऐलावार, तृतीय बक्षीस निहांश पुण्यप्रेडीवार, चतुर्थ बक्षीस पेशशट्टीवार यांना मिळाला, स्पर्धकांचे मूल्यांकन भारती तीतरे, संजय बंडावार, तुषार चांदेकर संजय
कुणघाडकर सर यांनी केले,
या झालेल्या उत्सवात बालगोपालांनी अप्रतिम नंदीबैल, शेतकरी रूप आणि विविध पारंपरिक वेशभूषा साकारून चामोर्शी शहरातील वातावरण अधिकच रंगतदार केले. खेळणी, रंगीबेरंगी सजावट, व प्रामुख्याने महेश कुमार बोदलकर यांचा ऑर्केस्ट्रा संगीत व सुरज गेडाम यांचा धडक महाराष्ट्र लावणी ग्रुप यांचा नृत्यकला आविष्कार व गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तान्हा पोळ्याला विशेष आकर्षण लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आशिषभाऊ पिपरे तर संचालन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी व आभार सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ आईचंवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल मेनेवार, ओमदास झरकर,करण गंगज, ऋषी गोरडवार,नगरपंचायत कर्मचारी, पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले,






