Home Breaking News *मेहा बुजरुक तालुका सावली येथे जितू भाऊ धात्रक मित्रपरिवारातर्फे तान्हापोळा महोत्सव उत्साहात...

*मेहा बुजरुक तालुका सावली येथे जितू भाऊ धात्रक मित्रपरिवारातर्फे तान्हापोळा महोत्सव उत्साहात साजरा*

229

*मेहा बुजरुक तालुका सावली येथे जितू भाऊ धात्रक मित्रपरिवारातर्फे तान्हापोळा महोत्सव उत्साहात साजरा*

 

उपरी..

 

*वेशभूषा व नंदीबैल सजावटी स्पर्धेचे मेहा बूज येथे आयोजन,विजेत्यांना रोक रक्कम आणि प्रत्येक नंदीधारकाना बुक आणि पेन चे जितू भाऊ धात्रक यांच्याकडून बक्षीस आणि वाटप करण्यात आले*

 

 

तान्हा पोळा निमित्त सावली तालुक्यातील मेहा बुज गावात परंपरेनुसार यावर्षी सुद्धा तान्हापोळा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला, हा सन जो लहान मुलांच्या हौसेसाठी असतो. या दिवशी लहान मुले लाकडी किंवा मातीचे छोटे बैल सजवून त्यांची मिरवणूक काढतात, तर मोठे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करतात. हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो, जो शेतीमधील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचा उत्सव आहे.मुक्या प्राण्याना सुद्धा हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व देणारा हा सण आहे.

 

नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धा ही मेहा बुजरुक येथील हनुमान मंदिर येथील पटांगणात आयोजित करण्यात आली होती.विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात आली.त्यात प्रथम पुरस्कार तीन हजार रुपये अनुयोग अनंता धात्रक ,द्वितीय पुरस्कार दोन हजार रुपये एपाज कुरेशी, तृतीय १ हजार रुपये प्रफुल कोलते यांना देण्यात आले. याव्यतिरिक्त तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बुक आणि पेन चे वाटप आणि बक्षीस जितू भाऊ धात्रक सामाजिक व भाजपचे युवा नेतृत्व तसेच धात्रक प्रॉपर्टी यांच्यातर्फे देण्यात आले.

 

स्पर्धा निरीक्षण करताना मेहा बुजरुक येथील वामनरावजी इलमलवार , लोमेश पाटील श्रीकोंडावार, राजू भाऊ भोयर, राजू भाऊ निकुरे, रोशन पेंदाम, राजूभाऊ कोलते गुरुजी , तसेच इतर मेहा ग्रामवासीय तसेच सूत्र संचालन मनोज भाऊ तरारे यांनी केले

. पंच सर्वांनी मिळून सर्व स्पर्धकांची पाहणी केली. ह्या स्पर्धेत संपूर्ण गावातील सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घेतला आणि लहान मुलांचा सुद्धा आनंद द्विगुणीत केला. जितू भाऊ धात्रकयांच्या पुढाकाराने व ग्रामवांसियांच सहकार्य लाभले व तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Don`t copy text!