*भारतीय परंपरा जपण्यासाठी उत्सव घेणे काळाची गरज :- गीता हिंगे*
*गडचिरोली शहरातील आशिर्वाद नगर येथील तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
गडचिरोली दि. २३-८-२०२५
गडचिरोली शहरातील आशीर्वाद नगर येथील तान्हा पोळा उत्सव २५ वर्षाची परंपरा कायम ठेवत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. नामदेव किरसान , आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते , भाजपा जिल्हा महामंत्री गीता हिंगे, ऍड.विश्वजीत कोवासे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, कांग्रेस महिला आघाडी अध्यक्षा कविता माहोरकर, राजेशभाऊ कात्रटवार,प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.
यावेळी तान्हा पोळा उत्सवात हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. वेशभूषा आणि नंदी सजावट स्पर्धेत जवळ पास ५०० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी एकाहून एक असे वेगवेगळ्या वेशभूषेतील स्पर्धक आणि नंदी सजावट प्रेषकांना आकर्षून तर घेतच होते पण परीक्षकांची पण परीक्षण करतांना तारांबळ उडाली. रामलल्ला ची वेशभूषा तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान ठरले. या कार्यक्रमात आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आशीर्वाद नगर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच भाजपा शहर महामंत्री मंगेश रणदिवे यांना लोकमत भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ,साहिल बारापात्रे महाराष्ट्र आईस हॉकी टिम मध्ये निवड झाल्याबद्दल , वर्षा कऱ्हाडे शिक्षक सहकारी पॅनल मध्ये निवडून आल्याबद्दल या सर्वांचा आशीर्वाद नगर तर्फे नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याचा वेळी मनोगत व्यक्त करतांना गीताताई हिंगे म्हणाल्या,” आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि ठिकठिकाणी सत्कार झाले. परंतु आपल्या वार्ड किंवा नगर म्हणजे आपल्या घरच्या लोकांकडून आपला सत्कार हा माझ्यासाठी अतिशय मोलाचा आहे. त्यांनी सर्व बालगोपालांचे कौतुक सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
स्पर्धेत वेशभूषा स्पर्धे मध्ये ७००१ चे प्रथम बक्षीस गीता सुशील हिंगे यांचेकडून, द्वितीय बक्षीस ५००१ महेश काबरा यांचेकडून ,तृतीय बक्षीस ३००१ शालिग्राम विधाते यांचेकडून, चतुर्थ बक्षीस २००१ आध्या कॅटर्स यांचेकडून तर पाचवे बक्षीस १००१ चे प्रदीप रणदिवे यांचेकडून तसेच नंदी सजावट मध्ये ५००१ प्रथम बक्षीस फारुखभाई शेख यांच्याकडून, द्वितीय बक्षीस ३००१ चे विरेंद्र बोपचे कडून, तृतीय बक्षीस २००१ चे सागर हजारे कडून , चतुर्थ बक्षीस १००१ चे रामने सर यांचेकडून देण्यात आले तर काही प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा देण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना मिल्टन ची पाणी बॉटल भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अतिशय उत्तमरित्या केले होते. विशेषतः रवी मेश्राम, संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, प्रवीण रक्षमवार या युवकांच्या पुढाकाराने तसेच प्रदीप रणदिवे,गजानन दहीकर, महेश काबरा, सुशील हिंगे ,शिंदे सर, चेतन समर्थ, दिलीप आखाडे , साळवे सर, विजय वाघुलकर, भडके सर, विधाते साहेब, डॉ. नगराळे, हमीद शेख, राजू नेरकर, नरेश पोरेड्डीवार, नारदेलवार सर, हेमके सर, रोहित वैष्णवी, कांचन दशमुखे,बेहरे सर, मुलकलवार सर यांच्या सहकार्याने आशीर्वाद नगरातील तान्हा पोळा अतिशय उत्साहात पार पडला.






