५% टक्के दिव्यांग निधी हा वस्तूच्या स्वरूपात न देता रोखरक्कम किंवा खात्यात जमा करण्याबाबत निवेदन सादर
ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातून ५%निधी हा गावातील नोंद करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तीला देण्याचा शासन निर्णय आहे, आता कोरोना महामारीचा काळ सुरू आहे आणि सर्वसामान्य प्रमाणे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनाही या परिस्थितीचा सामना करीत जगावे लागत आहे ,या हलाखीच्या परिस्थितीत ५% निधी हा रोख रकमेच्या स्वरूपात किंवा खात्यावर जमा केले तर आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल पण आताच्या विदारक परिस्थितीचा विचार न करता काही काही ग्रामपंचायत मध्ये हा निधी पैशाच्या स्वरूपात न देता वस्तूच्या स्वरूपात (दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू सोडून) देण्यात येत आहे अश्या स्वरूपाच्या तोंडी तक्रारी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष तथा रुग्णसेवक विकासभाऊ धंदरे यांच्याकडे प्राप्त झाल्या तेव्हा विकासभाऊ यांनी आरमोरी पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा करून सध्या असलेल्या उद्भवलेल्या परिस्थिती ची दखल घेऊन ५%दिव्यांग निधी हा रोख किंवा दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन प्रत्येक ग्रामपंचायत च्या सचिवांना देण्यात यावे असे निवेदन सादर करण्यात आले