Home Breaking News *सामाजिक न्याय विभागात ‘शिक्षक दिन’ साजरा* 

*सामाजिक न्याय विभागात ‘शिक्षक दिन’ साजरा* 

103

*सामाजिक न्याय विभागात ‘शिक्षक दिन’ साजरा*

गडचिरोली दि. ९: समाज कल्याण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 3 निवासी शाळा, 11 आश्रम शाळा आणि 16 दिव्यांग शाळा येथील शिक्षक, अधीक्षक यांचा शिक्षक दिनानिमित्त आज सत्कार करण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पहिल्यांदा निवासी शाळा, आश्रम शाळा येथील शिक्षकांसाठी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांना संविधानाच्या उद्देशिकाचे प्रत आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ देण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा मधील गुणवत्ता दर्जा वाढविणे आणि कॉन्व्हेंट च्या तुलनेत उच्च गुणवत्ता देणे यासाठी वर्षभराचे नियोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त, श्री. वासुदेव भुसे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ), श्री. अमरसिंग गेडाम उपशिक्षणाधिकारी, श्री. कुलदीप मेश्राम लेखाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक,वसतिगृह अधीक्षक उपस्थित होते.

Don`t copy text!