कसनसूर केंद्राचे नवभारत साक्षरता प्रशिक्षण व सहविचार सभा तसेच
नवनियुक्त केंद्रप्रमुख साखरे सर यांचा सत्कार सोहळा हालेवारा येथे संपन्न
एटापल्ली – वृत्तवाणी न्यूज
नवभारत साक्षरता NILP प्रशिक्षण व शिक्षक सहविचार सभा जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालेवारा केंद्र कसनसूर येथे आयोजित करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच श्रीमती संध्याताई कणालवार तर उद्धघाटक म्हणून माजी सरपंच श्री वासुदेव गेडाम हालेवारा होते.प्रमुख उपस्थिती योगेश साकिनलवार सदस्य शाळा व्यवस्थापन सदस्य, सत्कारमूर्ती केंद्रप्रमुख साखरे सर, पदविधर शिक्षक तथा मुख्याध्यापक शिरीष येरावार ,मुख्याध्यापक कावरे सर,मुख्याध्यापक आत्राम सर,मुख्याध्यापक चन्नावार सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्तावना गोटा सर यांनी केले तर मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेचे औचित्य साधून नवनियुक्त केंद्रप्रमुख साखरे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्राच्या वृत्तीने सत्कार करण्यात आला. सहविचार सभेत नवभारत साक्षरता अभियान संदर्भात पार्श्वभूमी, ध्येय, उद्देश,तथा व्याप्ती इत्यादी बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भाषा तथा मूल्यमापन संबंधाने , गणित विषयात अपेक्षित अध्ययन निस्पती साध्य करण्यासाठी नियोजन व कृती मालिका,तसेच ऍपवर नोंदणी, टॅगिग, लॉगिन व इतर विषयावर चर्चा करण्यात आली.शेवटी आभारप्रदर्शन सचिन वाकडे यांनी केले.शेवटी भोजन करून खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभेची सांगता झाली. नवभारत साक्षरता प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालेवारा येथे यशस्वी करण्यासाठी पदविधर शिक्षक तथा मुख्याध्यापक शिरीष येरावार, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालेवारा मुखध्यापक गोटा सर यांनी पुढाकार घेतला.






