भाजपा, जिल्हा गडचिरोली – सेवा पंधरवडा कार्यक्रम व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक
दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी यमुना लॉन, पोतेगाव रोड, गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रम 2025 व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक भव्यदिव्य वातावरणात पार पडली.
या बैठकीत मुख्य उपस्थिती मान. डॉ. उपेंद्रजी कोटेकर, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत Next GEN GST Reform, मराठा आंदोलन यशस्वी करण्यासाठी घेतलेली भूमिका, तसेच आगामी राजकीय दिशा यासंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन झाले.
या प्रसंगी माजी खासदार डॉ.अशोकजी नेते, माजी आमदार सुधाकरजी कोहळे, जिल्हाध्यक्ष, श्री रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी वाघरे, माजी आमदार श्री. कृष्णाजी गजबे डॉ.देवरावजी होळी, डॉ. नामदेव उसेंडी, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प करत भाजपा गडचिरोली जिल्हा दृढपणे पुढे जात आहे.
भारतीय जनता पार्टी – सेवा हीच संघटना






