Home Breaking News गडचिरोली विधानसभाक्षेत्र आमदार मा. मिलिंदजी नरोटे यांची त्यांच्या कार्यालयात भेट

गडचिरोली विधानसभाक्षेत्र आमदार मा. मिलिंदजी नरोटे यांची त्यांच्या कार्यालयात भेट

116

गडचिरोली विधानसभाक्षेत्र आमदार मा. मिलिंदजी नरोटे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना रखडलेल्या रस्त्यांच्या कामा बद्दल माहिती दिली त्यामुळे वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वाहनांना होत असलेल्या नुकसानाबद्दल रस्त्यांवर पडलेल्या खड्यांबद्दल कळविण्यात आले व गडचिरोली येथील चामोर्शी बसथांबा येथे प्रवासी निवारा उभारणे,गडचिरोली शहरामधील मुख्य रस्त्यांवरील मोकाट जणावरांचा बंदोबस्त करणे, मराठी पाट्या सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापणे येथे मोठ्या अक्षरात दर्शनीय ठिकाणी लावण्याबाबत संबंधित कार्यालय व अधिकारी यांना सूचना द्यावे या बद्दल निवेदन दिले व गडचिरोली विधानसभा क्षेत्र येथे भेडसावत असलेले इतर प्रश्न अश्या संबंधित सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली वरील विषयांचं लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत संबंधित कार्यालय व अधिकाऱ्यास सूचना देऊ अशे आश्वासन देण्यात आले…
यावेळी,राजेंद्र साळवे मनसे जिल्हा अध्यक्ष गड., इंजि. अंकुश संतोषवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गड., शुभम कमलापूरवार मनविसे शहराध्यक्ष गड., आकाश कुळमेथे मनविसे सचिव गड., संतोष राजकोंडावार व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Don`t copy text!