मार्कंडादेव येथे शिवलिंग स्थापना सोहळा भव्य उत्साहात संपन्न
मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत सुरपाम यांच्या कडुन संपुर्ण पुजा विधि पार पाडल्या गेला
चामोर्शी :-तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव नगरीत जय संतोषी मॉ शक्तिपिठ संस्थान अंतर्गत , मार्कंडेय शिवमंदिरात नवीन शिवलिंगाची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. सोमवारी सकाळी 7:30 वाजता शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चार, होम, हवन, अभिषेक व पूजाअर्चा छबिलदास नारायण सुरपाम भार्या अल्का सुरपाम यांच्या हस्ते मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत सुरपाम यांच्या ऊपस्थीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.
या सोहळ्यास गावातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजाविधी दरम्यान पारंपरिक रितीरिवाजांचे पालन करून प्रथम गणपती पूजन झाले. त्यानंतर पंचामृत, गंगाजल, दुग्ध, मध, दही, घी व शुद्ध जलाने शिवलिंगाचे अभिषेक करण्यात आले. बिल्वपत्र, विविध रंगांची फुले, धूप, दीप, नैवेद्य, नारळ, केळी, संत्री आदी फळांनी शिवलिंगाची सजावट करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात “ॐ नमः शिवाय” व “हर हर महादेव” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
स्थापना कार्यक्रमादरम्यान महिला भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवभजन व अभंग गाऊन उत्सवाला अधिक भक्तिमय केले. पुरुष भक्तांनीही एकत्रितपणे शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालून पूजा अर्चा केली. यानंतर सर्व उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थान चे उपाध्यक्ष सौ.रत्ना गेडाम.कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले मंजुळा वेलादी, डॉ रविंद्र सुरपाम तंटामुक्त समीती अध्यक्ष मुकरु शेन्डे, जिवन झाडे, घनश्याम आभारे,सह आदि मान्यवर उपस्थित होते.
मंदिरात शिवलिंग स्थापनेमुळे भाविकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. “गावाच्या एकतेचे व श्रद्धेचे हे प्रतीक असून यामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांना भगवान शंकराचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन जय संतोषी मॉ शक्तीपिठ संस्थान चे मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत सुरपाम प्रयत्नातून झाले. विशेष म्हणजे, हा धार्मिक सोहळा संपन्न झाल्याने गावकरी व श्रद्धाळूंनी याला अधिक महत्त्व दिले. भगवान शंकराकडे सुख-समृद्धी व समाधानासाठी प्रार्थना केली. स्थापनेच्या या मंगल सोहळ्यामुळे गावात भक्ती, श्रद्धा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात येथे नियमित पूजा-अर्चा व सण-उत्सव साजरे करण्याचे संस्थान चा मानस आहे






