6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा 41 व्या स्थापना  दिनानिमित्य शासकिय कार्यालयात सॅनिटायझर मशिन उपलब्ध।

105

6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा 41 व्या स्थापना  दिनानिमित्य शासकिय कार्यालयात सॅनिटायझर मशिन उपलब्ध।

देसाईगंज:-   कोरोना माहामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेवुन भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आ. कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधितुन देसाईगंज शहरातिल  विविध कार्यालयात सॅनिटायझर मशिन उपलब्ध करुन देण्यात आले.
कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटिचा प्रभाव सर्वञ  जानवत आहे . राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असुन नागरिकांना कोरोना संक्रमणापासुन बचाव करण्या करिता आ.कृष्णा गजबे यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत  देसाईगंज शहरातील उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद कार्यालय इत्यादि नागरिकांच्या वर्दळिच्या  २० ठिकाणी सॅनिटायझर मशिन उपलब्ध करुन  दिल्या याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी  नागदेवे, नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतिलालजी कुकरेजा, माजी न्यायाधिश ज्ञानदेवजी परशुरामकर, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, मुख्यधिकारी डॉ. कुलभुषन रामटेके, नगर परिषद  कार्यालयिन कर्मचारी उपस्थित होते.