Home Breaking News _*आवळगाव येथे दुर्गामाता मूर्ती स्थापना सोहळा उत्साहात पार*_

_*आवळगाव येथे दुर्गामाता मूर्ती स्थापना सोहळा उत्साहात पार*_

182

_*आवळगाव येथे दुर्गामाता मूर्ती स्थापना सोहळा उत्साहात पार*_

 

_*माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न*_

 

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी

_ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव येथील श्री दत्तात्रय राम मंदीर गुरुबाबा देवस्थान, त्रिवेणी संगम परिसरात दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दुर्गामाता मूर्तीची स्थापना भक्तिभावात पार पडली._

_*या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर उपस्थित होते,* तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर,विठ्ठलजी किनेकर,अनिलजी कामडी,प्रितमजी बावनवाडे सरपंच आवळगाव,रुपेशजी बानबले,घनश्यामजी ठाकरे,दिनकरजी चौधरी,गणेशजी आंबोरकर,बिसनजी दुमाने,गजाननजी आवारी,धर्मरावजी आष्टेकर,महाराज प्रविनजी दर्वे,केशवजी बानबले, पुरुषोत्तमजी भांडारकर,श्रावनजी आंबोरकर,संदिपजी आष्टेकर,सुनिलजी लोनारे,रवीजी आंबोरकर, पुरुषोत्तमजी खेवले,दिनकरजी ठाकरे,भाष्करजी आष्टेकर,उपस्थित होते. तसेच विविध मान्यवर, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले._

_स्थापना सोहळ्याच्या निमित्ताने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला होता. उपस्थित भाविकांनी “जय माता दी” च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले._

_या प्रसंगी अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, “माता दुर्गा ही शक्ती व श्रद्धेचे प्रतीक आहे. आवळगाव येथील ही स्थापना ग्रामस्थांच्या एकतेचे व भक्तीभावाचे प्रतीक आहे. अशा धार्मिक कार्यामुळे समाजात सद्भावना, संस्कार आणि श्रद्धेची जपणूक होत राहते.”_

_सोहळ्याच्या शेवटी देवीच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. भक्तांच्या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला._

Don`t copy text!