महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या मागणीला यश…
तळोधी मोकासा येथे लाईट गेल्यास (बी एस एन एल )नेटवर्क ची समस्या गेल्या वर्षभरापासून भेडसवत होती यामुळे तळोधी मो व जवळील ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्थाप सहन करावा लागत होता व लोकांचे अतितातडीचे कामे होत नव्हती या विषयाबद्दल माहिती मिळताच इंजि अंकुश संतोषवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गड, यांनी चामोर्शी व गडचिरोली येथील बी एस एन एल कार्यालय येथे संबंधित विषयाचा पाठपुरावा केला व बॅटरी उपलब्ध न झाल्यास खडखट्ट्याक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कार्यालकडून या विषयाची ताबडतोब नोंद घेऊन बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली. याबद्दल अंकुश संतोषवार व मनविसे चे (बी एस एन एल) सिम वापरकर्त्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले.






