भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोडेपूर येथे
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा -वृत्तवानी न्यूज
शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोडेपूर येथे सायंकाळी चार वाजता रघुनाथ
ऊइके वय 55 हा शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






