दुचाकीवर वीज कोसळून काका पुतण्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
वर्धा – वृत्तवानी न्यूज
वर्ध्याच्या सोनेगाव -अलिपूर मार्गावरून चारंमंडळ कडे जात असताना दुचाकीवर वीज कोसळून काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृद्यस्पर्शी घटना घडली.तर दुचाकीस्वारचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास घडली.
भिवापूर येथील रहिवासी अनिल ठाकरे आपल्या 17वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून चारमंदल कडे जात असताना वाटेत पावसाला सुरुवात होऊन विजांचा कडकडाट वाढला. व जात असताना त्यांच्या दुचाकीवरच वीज कोसळून यात दुचाकीस्वार अनिल व पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झाला.तर मुलगा वेदांत गंभीर जखमी झाल्याने त्याला हिंगणघाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






