*तळोधी मो येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* 

81

*तळोधी मो येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद*

*कुनघाडा रै:* पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी मो येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले हे होते तर उद्घाटक म्हणून केंद्रप्रमुख विनोद खोब्रागडे हे होते. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य धनंजय चापले यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आव्हान करून कोणताही विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडणार नाही यासाठी कृती आराखडा तयार करून शैक्षणिक साहित्याचा वापर करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख विनोद खोब्रागडे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीतिमान नागरिक बनविण्याचे कार्य करावे असे सांगितले. परिषदेची गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची तासिका शिक्षक गंपावार यांनी घेतली. तर शिक्षक कोहळे व किरमे यांनी नवोदय स्कॉलरशिप परीक्षेवर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत सहारे, पडवाल, पिपरे, वासुदेव सहारे, यांनी सहकार्य केले.