सावली तालुक्यात अपघातात दोन ठार
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे शेतात फवारणीचे औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ताकडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला हद्दीत ट्रकने धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी – खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे.