राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे कोव्हीड लस ची सक्ती करू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

143

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे कोव्हीड लस ची सक्ती करू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गडचिरोली:- भारतातील वेगवेगळ्या राज्यात कोव्हिड लसीकरण मोहिमेच्या दरम्यान काही कर्मचारी व नागरिक यांनी लस घेतल्यानंतर मृत्यू पावले आहे .याबाबत वृत्तपत्रातून अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच जे कर्मचारी वेगवेगळ्या दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत त्यांना लस घेतल्यानंतर विपरीत परिणाम होत आहेत .त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिक, कामगार कर्मचारी अशा परिणामामुळे खूप भयभीत आहेत. अशा स्थितीत जर कामगार कर्मचारी यांनी ती लस न घेतल्यास वेतन कपातीची, दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.ज्या अर्थी संपूर्ण भारत देशात कामगार कर्मचारी यांचे संवैधानिक अधिकार अबाधित ठेवण्याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कार्यरत आहे व सर्व सामान्य कामगार कर्मचारी यांचे प्रतिनिधित्व करीत आहे, म्हणून महाराष्ट्र राज्यातील तमाम कामगार कर्मचारी यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडून खालील बाबी लिखित हमी पत्र देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली. अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व 36 ही जिल्ह्यामध्ये करण्यात आली.
1)जे कामगार कर्मचारी दीर्घ आजाराने ग्रस्त आहे त्यांनी कोव्हाड लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर काही वाईट परिणाम होणार नाही याबाबतचे लिखित हमी पत्र देण्यात यावे.
2) ही जी कोव्हिड ची लस आहे ही लस घेतल्यामुळे 100% कोरोनाआजार होत नाही याबाबतचे लिखित हमीपत्र देण्यात यावे.
3) जर एखादा कामगार कर्मचारी कोव्हिड ची लस घेतल्यानंतर दगावला.तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला तो ज्या विभागात ज्या पदावर ज्या वेतनावर कार्यरत आहे त्या पदावर नोकरी देण्याचे हमीपत्र प्रशासनाकडून लिखित देण्यात यावे.
4)जर एखादा कामगार कर्मचारी कोव्हिड ची लस घेतल्यानंतर दगावला तर त्याच्या कुटुंबातील परी जनांना उदरनिर्वाह करण्यासाठी किमान एक कोटी व कमाल पाच कोटी रुपये देण्याचे लिखित हमी पत्र देण्यात यावे.
5)ही जि लस आहे ती लस घेतल्यानंतर कोरोना आजार होत नाही असे वैज्ञानिकाकडून जी तपासणी झाली आहे त्याबाबतचे तपासणी अहवाल सामान्य नागरिक, मजूर कामगार कर्मचारी यांना देण्यात यावे.
अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. निवेदन देताना प्रमोद बांबोळे उपाध्यक्ष पूर्व विदर्भ,अशोक वंजारी जिल्हाध्यक्ष, जनार्धन ताकसांडे जिल्हा महासचिव,आर एम बी के एस, पुंडलिक शेंडे जिल्हाध्यक्ष प्रोटान, भोजराज कानेकर आनंदराव आलोणे ,नरेश बांबोळे, यज्ञराज जनबंधू , कल्पना लाडे हे उपस्थित होते.