04 ऑक्टोबर ला आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजन
सर्व प्रथम *प्रभातफेरी* काढुनी
छत्रपती शिवाजी महाराज चौक मासळ येथे *छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ प्रतिमेला वंदन* करून पुढील कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात पाहुण्यांना पुष्पगुच्छ व स्वागत गीताने *मानवंदना* देण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी मराठी *भाषेचा गौरव* करुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल *शुभेच्छा* दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी *विविध मराठी नृत्य व मराठी खेळ* सादर केले.
पूर्व सुचनेनुसार आज शाळेतील सर्व शिक्षक, स्वंयसेवी शिक्षक, मदतनीस तथा सर्व विद्यार्थ्यी *मराठी वेशभूषेत* असल्याने या कार्यक्रमास विशेष औचित्य लाभले व कार्यक्रम मराठी भाषेला शोभेल असाच पार पडला.
याप्रसंगी आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय *अध्यक्ष श्री डोमेश्वरजी सोनटक्के* यांची पूर्णवेळ उपस्थिती आम्हाला नेहमीप्रमाणे उत्साहवर्धक ठरली.
*सर्वाचे मनःपूर्वक आभार*
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ