गुडुंजूर गावातील जनतेचा विजय! भाकपच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीस मंजुरी
गडचिरोली :
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) अखंड प्रयत्नांमुळे आणि स्थानिक जनतेच्या एकजुटीमुळे गुडुंजूर (ता. एटापल्ली) गावात शिक्षणाचा उजेड पोहोचला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत, वर्गखोली, किचन शेड आणि स्वच्छतागृह बांधकामासाठी एकूण रु. 34,62,008 इतका निधी समग्र शिक्षण विभाग (प्राथ.) जि.प. गडचिरोली यांनी मंजूर केला आहे.
८ ऑक्टोबर २०२५ पासून निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच बांधकाम कार्याला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे गावातील जनतेत आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षांपासून भाकपने सातत्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला, आणि अखेर सन २०२५-२६ मध्ये मंजुरी मिळाली.
याच सत्रात, पक्षाच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच गुडुंजूर गावात शाळा सुरु झाली, जी सध्या पारंपरिक गोटूल भवनात चालवली जात आहे.
🇮🇳 भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गुडुंजूर गावात कधीच शाळा नव्हती, पण आज लाल झेंड्याखाली झालेल्या संघर्षामुळे शिक्षणाचं दार अखेर खुलं झालं आहे. पावसाळ्यात चिमुकल्यांना शिकताना होत असलेली अडचण आता दूर होणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोत कुरवार म्हणाले—
> “ही मंजुरी केवळ भाकपची उपलब्धी नाही, तर कष्टकरी, कामगार आणि आदिवासी समाजाच्या संघर्षाचा विजय आहे. भाकपा भविष्यातही अशाच पद्धतीने जनतेच्या हक्कासाठी लढाई सुरू ठेवेल.”
गुडुंजूर ग्रामस्थांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत भाकप आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
हा विजय म्हणजे शिक्षण, समानता आणि संघर्षाच्या वाटेवरील लाल झेंड्याचा नवा अध्याय आहे! 🚩