लसीकरणाची दोन्ही डोज घेतल्यानंतरही डॉ. गोगुलवार ,शुभदा देशमुख यांना कोरोनाचा संसर्ग
गडचिरोली: कोरोना लसीकरणाची दोन्ही डोज घेतल्यानंतरही जेष्ठ समाजसेवक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून सध्या दोघेही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार घेत आहेत. डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील दुर्गम भागात आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यांचे निवासस्थान व कार्यालय कुरखेडा येथे आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यांनी आधीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.फेब्रुवारी महिन्यात लसीकरणाची दोन्ही डोज पूर्ण झाले होते.तरीही त्यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला.त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार सुरू आहे.सध्या दोघांचीही प्रकृती बरी आहे.