श्री साई दुर्गा उत्सव मंडळ तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान व फळवाटप

21

श्री साई दुर्गा उत्सव मंडळ तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान व फळवाटप

 

दि. 17 ऑक्टोबर 2025

 

गडचिरोली :गडचिरोली शहरातील साईनगर येथील श्री साई दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने दीपावली निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत “अन्नदान हेच श्रेष्ठदान” या संकल्पनेतून मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देऊन अन्नदान व फळवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

 

या भेटीदरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच परिसरातील स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली. नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री निखिल गुंडमवार यांनी यावेळी दिली.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साई दुर्गा उत्सव मंडळातर्फे दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या सहकार्याने साजरा होणाऱ्या या उत्सवातील निधीचा एक भाग सामाजिक उपक्रमात रूपांतरित करून अन्नदान व फळवाटप कार्यक्रम राबविण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाने अन्नदान व फळांचा प्रसाद वाटून सन्मानित करण्यात आले.

 

या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मंडळाने आदर्श घालून दिला आहे.

 

या उपक्रमात निखील गुंडमवार, आयूष न्यालेवार , शिवम कार्लावार, रितेश पोटावी, वेदांत कोवे आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.