Home Breaking News अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण तसेच  विविध पदभरती बाबत स्पर्धा...

अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण तसेच  विविध पदभरती बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण

72

अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण तसेच

विविध पदभरती बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण

 

गडचिरोली, (जिमाका) दि.28 ऑक्टोबर : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्यावतीने जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) दरमहा विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.01 नोव्हेंबर 2025 पासुन 27 नोव्हेंबर 2025 पर्यत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली कार्यालयात सादर करावेत. मुलाखत 28 नोव्हेंबर 2025 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे, त्याकरीता उपस्थ‍ित राहावे. अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!