Home Breaking News *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे...

*अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे -*

167

*अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे -*

 

*डॉ. प्रणय भाऊ खुणे*

*प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना*

 

28 ऑक्टोबर 2024

चामोर्शी

नुकताच गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीतील उभे पिक मोठ्या प्रमाणात आडवे झाले खाली पडले व मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे हलके धान उत्पादन करणारे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांचे धान पीकून आहे व त्या सर्व शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे धान कापणी झालेले आहे व अवकाळी पावसामुळे पावसात धान भिजून खूप मोठा नुकसान झालेला आहे तरी राज्य शासनाने जिल्ह्यातील समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करावे व झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य शासनाने करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली.

*अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे.हाता तोंडाशी आलेले धानपिक डोळ्यादेखत वाया गेले… बंगालच्या उपसागरातील वादळामुळे गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. धानपिक कापणीला आले वर्षभर पोटाची भूक भागविणाऱ्या पिकाची अशी नासाडी झाली. त्यामुळे शेतकऱ्यावर अश्रू ढाळण्याची अशी दुर्दैवी वेळ आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धानपिकाचे हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे Devendra Fadnavis Adv. Ashish Jaiswal. CMOMaharashtra. Milind Ramji Narote Namdeo Kirsan Ajit Pawar

Don`t copy text!