Home Breaking News *डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्ष...

*डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कैलास बोखा पाडवी यांची निवड जाहीर* 

73

*डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कैलास बोखा पाडवी यांची निवड जाहीर*

 

फोटो..

 

मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कैलास बोखा पाडवी यांची निवड जाहीर केली आहे.

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात डिजिटल मिडिया परिषदेची मोर्चेबांधणी वेगाने सुरू केली आहे. राज्य,विभागीय आणि उर्वरित जिल्हा पातळीवर पदाधिकारी निवडी संदर्भांत दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे तर नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कैलास बोखा पाडवी यांची निवड नुकतीच निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व राज्य स्तरीय अधिवेशने,विभागीय मेळावे,महत्वपूर्ण बैठकांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याच्या सुचना श्री.ईश्वर मराठे व कैलास बोखापाडवी यांना देण्यात आल्या. नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सदस्य पदी ईश्वर मराठे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी कैलास बोखा पाडवी यांना या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.

देशमुख सर यांनी व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे,राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर, प्रदेश सहसचिव राहुल शिंदे,प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाठ,प्रदेश सदस्य अनिल धुपदाळे,प्रदेश सदस्य शेख अफताब,प्रदेश सदस्य मल्हार पवार,प्रदेश सदस्य तानाजी जाधव, प्रदेश सदस्य सह सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Don`t copy text!