Home Breaking News *ढेकणी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीने केली परसबागेची निर्मिती*

*ढेकणी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीने केली परसबागेची निर्मिती*

154

*ढेकणी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीने केली परसबागेची निर्मिती*

‘माझी शाळा माझा अभिमान’ अंतर्गत राबविला उपक्रम**

*गावातील महिला बचत गटांचा पुढाकार*

 

कुनघाडा (प्रतिनिधी):

ढेकणी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राने संयुक्तपणे परसबाग निर्मितीचा उपक्रम राबविला. “माझी शाळा माझा अभिमान” या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे, पर्यावरणसंवर्धनाचे आणि पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

 

मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन मट्टामी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुखदेव कुमोटी व अंगणवाडी सेविका सुमित्रा कुमोटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवर्ग, विद्यार्थी, बचत गटातील महिला तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शाळा परिसरातील मोकळ्या जागेवर भाजीपाला लागवड करून हरित व स्वच्छ वातावरण निर्मिती करण्यात आली.

 

या उपक्रमात गावातील महिला बचत गटांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. आरती स्वयंसहाय्यता समूहाच्या सचिव सविता कुमोटी, अध्यक्ष कौशल्या कुमोटी, दासुंदा कुमोटी, सुमित्रा कुमोटी, रत्ना दुग्गा, गुजाबाई कुमोटी. कीर्ती स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा शशिकला गावडे, सचिव सुमित्रा नरोटे, सोनिबाई ताडामी, अस्मिता नरोटे, सविता कोंदामी, निर्मला ताडामी, बसंती तिग्गा, नुनीबाई कलखो, आदर्श स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा वनिता मट्टामी, सचिव मनिषा कुमोटी, मनीषा ताडामी, निवृत्ता कुमोटी, शेवंता कुमोटी, वनिता मनोर, कमलाबाई कुमोटी, कौशल्या नरोटे, सुमन नरोटे आदी महिलांनी श्रमदान करून परसबागेची निर्मिती साकारली.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना श्रमाची जाणीव, नैसर्गिकतेशी जवळीक आणि आरोग्यदायी अन्नाचे महत्त्व समजले. तसेच शाळा व अंगणवाडी परिसर हरितमय झाला आहे.

 

मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार यांनी सर्व सहभागींचे आभार मानून सांगितले की, “परसबाग उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देतो आणि आत्मनिर्भरतेचा सुंदर संदेश देतो.”

Don`t copy text!