खरपुंडी येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
खरपुंडी, दि. 15 नोव्हेंबर 2025
गडचिरोली: खरपुंडी ग्रामपंचायत परिसरात आज आदिवासी समाजाचे जननायक, शौर्य व स्वाभिमानाचे प्रतीक वीर बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती अभिमानाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद कोटगल–मुरखडा विभागाचे शिवसेना (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नवनाथ उके उपस्थित होते.
या प्रसंगी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनमूल्यांवर भाष्य करत, आदिवासी समाजाच्या संस्कृती, हक्क आणि विकासाच्या प्रश्नांबाबत विधायक संवादाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी सांगितले की,
नवनाथ उके यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने दिलेल्या मार्गदर्शनामुळे गावांत सहभाग, समन्वय आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत झाली आहे.
समाजातील प्रश्न ऐकून घेणे, गावपातळीवरील नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि रचनात्मक मार्गदर्शन करणे—या त्यांच्या भूमिकेचा उल्लेख नागरिकांनी विशेषत्वाने केला.
कार्यक्रमात ग्रा. पं. उपसरपंच सुनील नैताम, ग्रा. पं. सदस्य मिलिंद जी आकरे, चंद्रभान चलाख सर, माजी उपसरपंच कमलेश खोब्रागडे, शामराव जी उसेंडी, वामनजी टिकले, लोमेशजी शेंडे, आरतीताई खोब्रागडे, शोभाताई, मंगलाताई इरपाटे, जैरामजी तुमाने यांसह गावातील आदिवासी समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे वितरण नवनाथ उके यांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडले.
या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समारोपात उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांनी दाखविलेल्या संघर्ष, समानता आणि स्वाभिमानाच्या मार्गाचा वारसा जपण्याचे आवाहन केले. ग्रामीण समाजातील एकजूट, सहभाग आणि परंपरा यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.





