गणेशनगरमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
थेट संवादातून विकासाचा निर्धार पुन्हा स्पष्ट!
आमदार डॉ मिलिंद नरोटे व नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल तिडके यांच्या सभेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
गडचिरोली – वृत्तवानी न्यूज
नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रचाराच्या अनुषंगाने आज प्रभाग क्र. ११, गणेशनगर येथे आयोजित कॉर्नर सभेला जनतेचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
सभेदरम्यान नागरिक, माता-भगिनी आणि तरुणांशी संवाद साधून स्थानिक पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांशी निगडित समस्या जाणून घेतल्या.
जनतेच्या अपेक्षा आणि प्रश्न ऐकून त्यांचे वेगाने व ठोस निराकरण करण्याचा राजकीय संकल्प व्यक्त केला. विकासकामांच्या प्राधान्यक्रमावर चर्चा झाली आणि प्रभागाच्या भविष्यातील संपूर्ण विकासाचा रोडमॅप जनतेपुढे ठेवला.
गणेशनगरच्या प्रत्येक घराचा विश्वास—हीच आमची ताकद!
नागरिकांच्या आशीर्वादाने आणि साथीनं प्रभागाचा विकास थांबणार नाही, तर आणखी वेग घेईल.
नगरपरिषद निवडणुकीत आपल्या हक्काच्या उमेदवाराला विजयी करा!
हीच विनम्र विनंती.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री दत्तूजी सूत्रपवार, डॉ. चंदाताई कोडवते, श्री. जनार्दनजी साखरे, प्रभाग ११ चे अधिकृत उमेदवार पायलताई अलाम, श्री. अनिलजी तिडके, डॉ. रौनकजी फेबुलवार, डॉ. शिल्पा कोहळे, श्री. हरीशजी माकडे, श्री. साईजी सिलमवार, श्री. प्रशांतजी कोटगले, व स्थानिक नागरिक उपस्थित होते.





