मतदान सुरक्षा कक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात प्रशासनाचे स्पष्टीकरण:-
आरमोरी नगरपरिषद निवडणूक कार्यालयातर्फे कळविण्यात येते की मतदान यंत्र सुरक्षा कक्षामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमधील एक कॅमेरा क्र.02 दिनांक 07-12-2025 रोजीच्या रात्री एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड (IP service message return error) झाल्याची नोंद झाली होती. मात्र इतर सर्व कॅमेरे पूर्णपणे सुरू व कार्यरत होते. सदर बिघाडाची माहिती मिळताच त्वरित तांत्रिक पथकास पाचारण करण्यात आले ,त्यानुसार तंत्रज्ञाने तातडीने कामास सुरुवात केली तसेच त्यादरम्यान बिघाड दुरुस्त होण्यासाठी सुमारे 45 मिनिटांचा वेळ लागला परंतु इतर कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग व्यवस्थितपणे सुरु होती.
एक कॅमेरा दुरुस्त होईपर्यंत इतर कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग NVR मधील स्टोरेज डीवाईस मध्ये अखंडपणे सुरू होते. त्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा संशयास्पद हालचाल झालेली नाही. संपूर्ण मतदान यंत्र सुरक्षा कक्ष दिनांक 02 डिसेंबर 2025 पासून पोलिस बंदोबस्तासह सीलबंद स्थितीत आहे.
प्रशासन हेही स्पष्ट करते की. ईव्हीएम यंत्र सुरक्षा कक्षामध्ये पूर्णपणे सुरक्षित स्थितीत आहेत, मतदान सुरक्षा कक्षाच्या चारही बाजुना 24*7 सुरक्षा यंत्रणा तैनात आहे, सीसीटीव्ही फूटेज नियमितपणे तपासले जात आहे, CCTV यंत्रणेतील कॅमेरा क्र.02 बंद झाल्याच्या स्थितीपासून तर पूर्ववत होईपर्यंत उमेदवार प्रतिनिधी श्री.चेतन निमगडे हे प्रत्यक्ष त्याठिकाणी उपस्थित होते तसेच त्याबाबतची नोंद सुरक्षा कक्ष लॉगबुकमध्ये घेतलेली आहे. तसेच त्यांनी सदर परिस्थितीची पाहणी केली असून त्यांच्या व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरहू कॅमेऱ्याचा तांत्रिक बिघाड यशस्वीरीत्या दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त सिसिटीव्ही लावण्यात आलेले आहे.एक सीसीटीव्ही कॅमेरा काही वेळेसाठी बंद असल्यामुळे सूरक्षेवर परिणाम झाला आहे, असे वृत्त वस्तुनिष्ठ नाही. प्रशासनाने नियमांनुसार सर्व आवश्यक पावले तत्काळ उचलली आहेत. नागरिकांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उषा चौधरी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रितीश मगरे यांनी केले आहे.




