11 वरिष्ठ माओवाद्यांनी केले पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण

55

 

11 वरिष्ठ माओवाद्यांनी केले पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण

 

* 02 डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 03 पीपीसीएम, 02 एसीएम व 04 सदस्य पदावरील माओवाद्यांसह एकूण 11 माओवाद्यांनी केले पोलीस महासंचालक म.रा. श्रीमती रश्मि शुक्ला मॅडम यांच्या समोर आत्मसमर्पण

* महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 82 लाख रुपयांचे बक्षिस

* 04 माओवाद्यांनी माओवादी गणवेशात आपल्या शस्त्रांसह पोलीस महासंचालक यांच्या समोर केले आत्मसर्पण

* गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 112 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

* माओवादविरोधी कारवाईत उत्कृष्ट कामगिरी करणा­या सी-60 अधिकारी व जवानांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार

* शासनाच्या विविध योजनांची मार्गदर्शिका पुस्तकाचे मा. पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मि शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण

 

……………………………………………………………………………………

 

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासह अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा दिनांक 09/12/2025 व आज दि. 10/12/2025 रोजी पार पडला. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 783 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 10/12/2025 रोजी अकरा जहाल माओवादी नामे 1) रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (डिव्हीसीएम- भामरागड दलम) वय 57 वर्षे, रा. एडसगोंदी ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, 2) भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम/ पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य), वय 46 वर्षे, रा. मौजा चिंतागुफा, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.), 3) पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम/ सेक्शन कमांडर पीएलजीए बटालीयन क्र. 01), वय 41 वर्षे, रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर (छ.ग.), 4) रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम कंपनी क्र. 07), वय 32 वर्षे, रा. टेकलगुडा, ता. उसुर, जि. बीजापूर (छ.ग.), 5) कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम कंपनी क्र. 07), वय 30 वर्षे, रा. एडापल्ली, ता. भोपालपट्टानम्, जि. बीजापूर (छ.ग.) 6) पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (एसीएम – कान्हा भोरमदेव दलम, एमएमसी झोन), वय 36 वर्षे, रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर (छ.ग.), 7) रामजी ऊर्फ मुरा लच्छु पंुगाटी (एसीएम, कुतूल एरीया कमिटी), वय 35 वर्ष, रा. कुमनार, ता. भामरागड, जि. गडचिरोली, 8) सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो (सदस्य, कंपनी क्र. 01 मधील प्लाटुन क्र. 02), वय 21 वर्षे रा. बेतेबेडा, ता. पखांजूर, जि. कांकेर (छ.ग.), 9) प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी (सदस्य, प्लाटून क्र. 32), वय 22 वर्षे, रा. गट्टेकाल, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.), 10) सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो (सदस्य, प्लाटून क्र. 32), वय 22 वर्षे, रा. पदगुंडा, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) 11) साईनाथ शंकर मडे, (सदस्य, एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) दलम) (सिसिएम उदय याचा गार्ड), वय 23 वर्षे, रा. सँड्रा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.), यांनी पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यावेळी 04 माओवाद्यांनी माओवादी गणवेशात आपल्या शस्त्रांसह पोलीस महासंचालक यांच्या समोर आत्मसर्पण केले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण 11 जहाल माओवाद्यांनी तसेच दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला असून गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली आहे.

 

पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या भेटीदरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिदुर्गम लाहेरी जंगल परिसरात जाऊन केंद्रिय समिती व पोलीत ब्युरो सदस्य तसेच केंद्रीय रिजनल ब्युरोचा सचिव मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह 02 डिकेएसझेडसीएम, 10 डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह एकूण 61 माओवाद्यांचे 54 अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण घडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात उत्कृष्ट कामगिरी करणा­या विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा पोलीस महासंचालक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस महासंचालक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सी-60 चे अधिकारी व जवान यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले आहेत. यासोबतच सदर कार्यक्रमप्रसंगी नागरी कृती उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी व अंमलदार यांना सुलभता व्हावी व दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संकलीत करण्यात आलेले ‘प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका’ हे पुस्तक तयार करण्यात आले असून सदर पुस्तकाचे अनावरण पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचे हस्ते अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

 

या विविध कार्यक्रमांसाठी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. कार्तिक मधीरा, सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

 

1) रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी

 

* दलममधील कार्यकाळ

 

* सन 2004 मध्ये मौजा एडसगोंदी गाव पंचायत जनताना सरकार चा अध्यक्ष पदावर नेमणूक होऊन सन 2005 पर्यंत काम केले.

* सन 2005 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2007 पर्यंत काम केले.

* सन 2007 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन गट्टा दलममध्ये सन 2010 पर्यंत काम केले.

* सन 2010 मध्ये एसीएम पदावर असताना भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत काम केले.

* सन 2019 मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2020 पर्यंत काम केले.

* सन 2020 मध्ये पेरमिली दलम कमांडर पदी बदली होऊन सन 2021 पर्यंत काम केले.

* सन 2021 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी याच्यावर गडचिरोली जिल्ह्रात आजपर्यंत एकुण 88 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 43- चकमक, 08-जाळपोळ व 37-इतर गुन्ह्राचा समावेश आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

2) भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी

* दलममधील कार्यकाळ

* सन 1998 मध्ये जगरगंुडा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2001 पर्यत काम केले.

* सन 2001 मध्ये माड एरीयामध्ये बदली होऊन सदस्य पदावर सन 2003 पर्यंत काम केले.

* सन 2003 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2005 पर्यंत काम केले.

* सन 2005 मध्ये पश्चिम बस्तर एरीयामधील गंगलुर एरीया कमिटीमध्ये बदली होऊन कमांडर पदावर सन 2006 पर्यंत काम केले.

* सन 2006 मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन प्लाटुन क्र. 02 च्या कमांडर पदावर सन 2007 पर्यंत काम केले.

* सन 2007 मध्ये एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) एरीयामध्ये बदली होऊन रिजीनल कंपनी क्र. 01 च्या कमांडर पदावर सन 2010 पर्यंत काम केले.

* सन 2010 मध्ये दक्षिण बस्तर एरीयामधील बटालीयन क्र. 01 मध्ये कमांडर हिडमा सोबत उप-कमांडर पदावर सन 2019 पर्यंत काम केले.

* सन 2019 मध्ये पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटीमध्ये सदस्य पदावर बदली होऊन बटालीयन पार्टी कमिटीचा उप-कमांडर व प्लाटुन क्र. 02 चा कमांडर म्हणून डिव्हीसीएम पदावर राहुन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

3) पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा

* दलममधील कार्यकाळ

* सन 2003 मध्ये नॅशनल पार्क एरीयामधील सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2004 पर्यंत काम केले.

* सन 2004 मध्ये गंगलुर दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर राहुन सन 2007 पर्यंत काम केले

* सन 2007 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2017 पर्यंत काम केले.

* सन 2017 मध्ये पीएलजीए बटालीयन क्र. 01 मध्ये बदली होऊन पीपीसीएम/सेक्शन कमांडर पदी पदोन्नती होऊन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

4) रतन ऊर्फ सन्न मासु ओयाम

* दलममधील कार्यकाळ

* सन 2012 मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन एक महिना काम केले.

* सन 2012 मध्ये कंपनी क्र. 07 मध्ये बदली होऊन सदस्य पदावर सन 2023 पर्यंत काम केले.

* सन 2023 मध्ये पीपीसीएम/एसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 07 मध्ये आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

5) कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी

* दलममधील कार्यकाळ

* माहे जुलै 2008 मध्ये मध्ये सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर 2008 पर्यंत काम केले.

* माहे सप्टेंबर 2008 मध्ये कंपनी क्र. 07 मध्ये बदली होऊन सन 2017 पर्यंत काम केले.

* सन 2017 मध्ये पीपीसीएम/एसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 07 मध्ये आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

6) पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी

* दलममधील कार्यकाळ

* सन 2006 मध्ये नॅशनल पार्क एरीयामधील सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2009 पर्यंत काम केले.

* सन 2009 मध्ये माड एरीयामधील कंपनी क्र. 07 मध्ये बदली होऊन सन 2010 पर्यंत काम केले.

* सन 2010 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन कंपनी क्र. 07 मध्ये सेक्शन कमांडर पदावर सन 2016 पर्यंत काम केले.

* सन 2016 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन एमएमसी झोनमधील कान्हा भोमरदेव दलममध्ये बदली होऊन एसीएम पदावर राहुन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

7) रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी

* दलममधील कार्यकाळ

* सन 2005 मध्ये डिकेएमएस (दंडकारण्य क्रांतिकारी मजदूर संघटन) मध्ये भरती होऊन सन 2011 पर्यंत सदस्य पदावर काम केले.

* सन 2011 मध्ये मेटेवाडा आरपीसी अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन तसेच मेटेवाडा एरीया कमिटी सरकार सदस्य पदावर नियुक्त होऊन सन 2015 पर्यंत काम केले.

* सन 2015 मध्ये कुतूल एरीया कमिटी जनताना सरकारमध्ये उपाध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन सन 2022 पर्यंत काम केले.

* सन 2022 एसीएम पदावर पदोन्नती होऊन कुतूल एरीया कमिटी जनताना सरकारमध्ये उपाध्यक्ष पदावर राहुन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

8) सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो

* दलममधील कार्यकाळ

* माहे जून 2017 मध्ये सीएनएम टीममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑगस्ट 2019 पर्यंत काम केले.

* माहे ऑगस्ट 2019 मध्ये सिएनएम टीममध्ये उप कमांडर पदावर पदोन्नती होऊन सन 2020 पर्यंत काम केले.

* सन 2020 मध्ये माड डिव्हीजन मधील कंपनी क्र. 01 मध्ये सदस्य पदावर भरती होऊन डिव्हीसीएम रुपीचा गार्ड म्हणून सन 2022 पर्यंत काम केले.

* सन 2022 मध्ये कंपनी क्र. 01 मधील प्लाटून क्र. 02 मध्ये बदली होऊन आजपावेतो सदस्य पदावर काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

9) प्रकाश ऊर्फ पांडु कुंड्रा पुंगाटी

* दलममधील कार्यकाळ

* सन 2020 मध्ये प्लाटुन क्र. 32 मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो सदस्य पदावर काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

10) सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो

* दलममधील कार्यकाळ

* सन 2022 मध्ये प्लाटुन क्र. 32 मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो सदस्य पदावर काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

11) साईनाथ शंकर मडे

* दलममधील कार्यकाळ

* सन 2020 मध्ये सँड्रा आरपीसी सीएनएम टीममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जूलै 2023 पर्यंत काम केले.

* माहे 17 जुलै 2023 रोजी नॅशनल पार्कमधील प्लाटून क्र. 02 मध्ये सदस्य भरती होऊन माहे मे 2024 पर्यंत काम केले.

* माहे मे 2024 मध्ये एओबी (आंध्रा-ओरीसा बॉर्डर) झोनमधील सीसीएम उदयच्या गार्ड मध्ये बदली होऊन आजपावेतो सदस्य पदावर काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

* शासनाने जाहिर केलेले बक्षीस

 

* महाराष्ट्र शासनाने रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने पोरीये ऊर्फ लक्की उडमा गोटा हिच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम याच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी हिच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने रामजी ऊर्फ मुरा लच्छु पंुगाटी याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो याच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी याच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो हिच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* महाराष्ट्र शासनाने साईनाथ शंकर मडेयाच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन पोरीये ऊर्फ लक्की उडमा गोटा हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामजी ऊर्फ मुरा लच्छु पंुगाटी याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सोनु पोडीयाम ऊर्फ अजय सानू कातो याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन साईनाथ शंकर मडे याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

(1. प्रकाश ऊर्फ पांडू कुंड्रा पुंगाटी व त्याची पत्नी सिता ऊर्फ जैनी तोंदे पल्लो व

2. भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी व त्याची पत्नी पोरीये ऊर्फ लक्की उडमा गोटा

3. रतन ऊर्फ सन्ना मासु ओयाम व त्याची पत्नी कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी)

 

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 10 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 146 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 मध्ये आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 11 माओवाद्यांसहित) एकूण 112 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.