लिंग पिसाट वैद्यकीय अधिकाऱ्यावर बडतर्फी ची कार्यवाही करून जिल्ह्याबाहेर हाकला शिवसेना नेत्या छायाताई कुंभारे यांची मागणी
वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून मागील दोन वर्षापासून मुलचेरा येथील एका कंत्राटी आरोग्य सेविकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुलचेरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करून जिल्ह्याबाहेर हाकला अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या छायाताई कुंभारे यांनी केली आहेत.
सदर डॉक्टर मागील दोन वर्षापासून वरील आरोग्य सेविकेला वेतनवाढ देण्याचे आश्वासन देऊन शारितिक व मानसिक त्रास देत होता.
त्रास असह्य झाल्याने आरोग्य सेविकेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सदर बाब ही अत्यंत घृणास्पद असून जिल्ह्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घाबरवणारी बाब असल्यामुळे वरील वैद्यकीय अधिकाऱ्यावर ताबडतोब कठोर कार्यवाही करून जिल्ह्याबाहेर हाकलून लावावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
निवेदन देतांना शिवसेना नेत्या छायाताई कुंभारे, जोत्सनाताई राजूरकर, आरतीताई खोब्रागडे शिवसेना गडचिरोली तालुकाप्रमुख नवनाथ उके, स्मिता उके, मिता परीकर उपस्थित होते.





