ट्रकच्या धडकेत कारमेल शाळेच्या शिक्षिका ठार
गडचिरोली (दि. १० डिसेंबर) आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी वाहणाने शाळेत जात असताना बी फॅशन मॉल च्या समोर गडचिरोली -चंद्रपूर रोडवर स्कुटी गाडी स्लीप होऊन खाली पडल्या. व शेजारून जात असलेल्या आयशर टेम्पोच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालय भरती केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृतक ह्या कारमेल शाळेच्या शिक्षिका कु. ममता बांबोळे वय ४३ रा.आयटीआय- गोकुळनगर बायपास रोड येथील होत्या.त्यांच्या मृत्यूने बांबोळे कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.
गडचिरोली वासीयांची रिंग रोडची मागणी
!!
गडचिरोली शहरातून चारही दिशेने जाणारे जड वाहने हे इंदिरा गांधी चौकातूनच जातात. परिणामी अशा एक ना अनेक अपघातामुळे अनेकांचा जीव जातो. त्यामुळे जड वाहनांसाठी गडचिरोली शहरा बाहेरून रिंग रोड लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी गडचिरोली करांनी केली आहे. जेणेकरून शहरात होणाऱ्या अपघाताला आळा बसेल.




