अवैध मुरूम उत्खननावर प्रशासनाची मेहरनजर

203

अवैध मुरूम उत्खननावर प्रशासनाची मेहरनजर

कारवाईची माहिती देण्यास चामोर्शीच्या उपविभागीय अधिकाऱ्याची टाळाटाळ.

चामोर्शी-
दिनांक १६/०४/२०२१ रोजी भाडभीडी मोकासा येथून पाहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे ३५३ साठी लागणारे मुरुम रात्री अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत होते. एस.जी. सी.आर.एस.बी आय पी एल कंट्रकशन औरंगाबाद यांच्या कडून मागील ४ महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी अवैध मुरुम वाहतूक करत असताना एस जी सी आर एस बी आय पी एल कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांच्या मालकीचे ३ हायवा ट्रक ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करीता तहसील कार्यालय चामोर्शी येथे तिन्ही हायवा ट्रक जमा करण्यात आली.यांची संपूर्ण कारवाई चामोर्शी चे उपविभागीय उत्तम तोडसाम यांनी केली आहे.परंतु या अवैध रीतीने मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आतापर्यंत किती रुपयांचा दंड आकारण्यात आला याची माहिती देण्यात आली नाही.हे. वाहने ताब्यात घेऊन ६ ते ७ तास झाले असून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी या वाहनांवर कुठलीही कारवाई केली नाही. याची माहिती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.यापूर्वी सुद्धा एस. जी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या वाहनांना अवैध मुरूम उत्खनन कारवाई करण्यात आली परंतु या अवैध उत्खननाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रशासनाने विशेष मेहर नजर दाखविल्याचे निर्दशनास येत आहे.