Home Breaking News राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात

50

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात

आष्टी (जि. गडचिरोली) :

महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी (जि. गडचिरोली) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ठाकरी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथे आयोजित सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोपिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या समारोपिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून समाजाशी नाते जोडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ठाकरी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. नंदाताई कुडसंगे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा शिबिर प्रमुख प्रा. रवी गजभिये यांनी शिबिरात घेतलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या शिबिराच्या माध्यमातून गावाला निश्चितच सामाजिक लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठलराव आचेवर (उपसरपंच, ग्रामपंचायत ठाकरी), श्री नागेश बाकमवार (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती ठाकरी), श्री वासुदेव कर्डेवार (अध्यक्ष, तंटामुक्त समिती ठाकरी), श्री दिवाकर कुडमेथे (माजी सरपंच), सौ. सरिता जुमनाके (मुख्याध्यापक, भगवंतराव हायस्कूल ठाकरी), मान. सौ. एस. डी. लोणारे (मुख्याध्यापिका, जि. प. शाळा ठाकरी), दुर्गे मॅडम, उत्तरवार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी प्रास्ताविकासह संपूर्ण शिबिराचा सविस्तर अहवाल वाचनातून मांडला. शिबिरादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

दिनांक 1 फेब्रुवारी रोजी संविधान सन्मान रॅली व मतदार जागृती,

2 फेब्रुवारी रोजी पशुवैद्यकीय तपासणी शिबिर व जनावरांचे लसीकरण,

3 फेब्रुवारी रोजी डॉ. वैष्णवी मारतीवार व त्यांच्या टीमच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर,

दुपारच्या सत्रात विविध बौद्धिक व्याख्याने,

तर रात्री तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच दररोज सकाळी योग, नृत्य व ध्यानधारणा असे उपक्रम राबविण्यात आले.

या यशस्वी शिबिराचे श्रेय प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांचे मार्गदर्शन, सरपंच सौ. नंदाताई कुडसंगे व ग्रामस्थांचे सहकार्य तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी प्रमुख साहिल गोटा, सांस्कृतिक प्रमुख पिंकी आत्राम, करीना पदा यांच्या उत्स्फूर्त सहभागास दिले.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी प्रमुख कु. मोनिका मुंजनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. मोहिनी हिने मानले.

या शिबिरासाठी प्रा. डॉ. शास्त्रकार, डॉ. मुसने, डॉ. पांडे, डॉ. खुणे, डॉ. कोरडे, प्रा. बोभाटे, प्रा. गभने तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रभाकर भोयर व दीपक खोब्रागडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Don`t copy text!