पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन गरजू रुग्णांना आधारविश्व फौंडेशन गडचिरोली च्या वतीने निशुल्क घरपोच डब्याची व्यवस्था !
संपर्क साधण्याचा आधारविश्व फौंडेशनचे अध्यक्ष गीता हिंगे यांचे आवाहन
गडचिरोली : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. अशावेळी सामाजिक जबाबदारी समजून जे लोक कोरोना बाधित आहेत किंवा गृहवीलगिकरणात आहेत असे परिवार किंवा स्वयंपाक करण्यास असमर्थ वृद्धांना शुद्ध सात्विक निशुल्क जेवणाच्या डब्ब्याची दोन्ही वेळेची व्यवस्था करून देण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
तुमच्या आसपास असे परिवार असतील जे कोरोनाग्रस्त आहेत व त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यास कुणीच नाही किंवा असमर्थ असतील तर आम्हाला माहिती द्यावी.आम्ही निशुल्क घरपोच डब्याची व्यवस्था करू.
जेवण बुंकिंग ची वेळ
सकाळच्या जेवणासाठी 9 वाजता व रात्रीच्या जेवणासाठी दुपारी 2 वाजता सकाळी डब्बा मिडेल सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान रात्रीचा डब्बा मिडेल 6 ते 9 वाजता. या सामाजिक कार्यात कोणाला मदत करायची असल्यास आपण करू शकता. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी अध्यक्षा गीता हिंगे -9168164441 , उपाध्यक्ष विना जबेंवार -9422709000 , सचिव सुनीता साळवे -9423122934 यांच्याशी संपर्क साधण्याचा आव्हान शहनांज शेख,अँड. कविता मोहरकर, विजया मने, कांचन चौधरी, सुचिता धकाते, अरुंधती नाथानी, दिलशाद हजियानी,लीला डांगे, मंजू कृष्णापुरकर , स्नेहा आखाडे यांनी केले आहे.