Home Breaking News *एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.*

*एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.*

60

*एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.*

 

*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन.*

 

*सुप्रसिद्ध गायिका कु.भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांच्या भक्ती-संगिताने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध.!*

 

*एटापल्ली:-* स्थानिक राजमुद्रा फाउंडेशन,समर्पण ट्रस्ट व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.

 

या भव्य सोहळ्याचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

 

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून नगरपंचायत एटापल्लीच्या नगराध्यक्षा रेखाताई मोहुर्ले यांनी उपस्थिती दर्शवली.

 

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिका कु.भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांनी सादर केलेल्या भक्तीगीत आणि भजन संध्येमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.शिवरायांच्या विचारांना अभिवादन करत संपूर्ण परिसर भक्तीमय व सांस्कृतिक वातावरणाने भारावून गेला होता.

 

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने करण्यात आली.

 

यावेळी कार्यक्रमात अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन एटापल्ली,राघवेंद्र सुल्वावार अध्यक्ष समर्पण ट्रस्ट,अमोल गजाडीवार,राहुल कुळमेथे,संपत पैडाकुलवार,मोहन नामेवार,बंटी भाऊ मोहुर्ले,प्रशांत आत्राम,राकेश हिरा,महेशभाऊ पुल्लुरवार,महेंद्र सुल्वावार,प्रशांत तोडेवार तसेच स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.!!

Don`t copy text!