Home Breaking News गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

53

 

गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघटना बळकट करण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने दिनांक 15 मार्च 2026 रोजी गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कॉम्प्लेक्स येथे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने संपन्न झाले.

या अधिवेशनात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील शासन व प्रशासन स्तरावरील विविध समस्या, त्यावरील उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरण राबविताना येणाऱ्या अडचणी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांचे भवितव्य व शासनाची भूमिका अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग, नागपूर येथील मा. नागो गाणार तसेच राज्य महिला आघाडी प्रमुख मा. पुजाताई चौधरी यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना मार्गदर्शन केले. मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवीन पिढीतील नवनियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक संघटनांशी सक्रियपणे जोडून विचारमंथन करावे आणि संघटना अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यथा भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवणे कठीण होऊ शकते, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली.

तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षक संघटना मजबूत करणे व विश्वासार्ह नेतृत्व निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या अधिवेशनात जिल्ह्यातील राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, विविध तालुक्यांतील तालुका पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर व शिक्षक बांधवांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

 

Don`t copy text!