Home Breaking News पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन

53

पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

गडचिरोली, (जिमाका) दि.16: नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली,महिला महाविद्यालय, गडचिरोली व फुले , आंबेडकर महाविद्यालय , गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 मार्च 2026 रोजी वेळ स.10.00 वा पासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी नामांकित कंपनी / आस्थापनांमध्ये विविध रोजगार व नोकरीच्या संधीसाठी उद्योजक विविध पदांसोबत सहभाग होणार असून बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत विविध पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे. तरी, गडचिरोली जिल्हयातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक – युवतींनी या रोजगार मेळाव्यास दिनांक 18 मार्च 2026 रोजी वेळ स.10.वा पासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे उपस्थिती राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्रं-2, कॉम्प्लेक्स, गडचिरोली-442605 तसेच ई-मेल gadchirolirojgar@gmail.com, व संपर्क क्र. श्रीमती.सक्रापूरे – 8788257016 इथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

0000

Don`t copy text!