Home गडचिरोली कोटमी येथे शिक्षण परिषदेचा उत्साहात यशस्वी आयोजन

कोटमी येथे शिक्षण परिषदेचा उत्साहात यशस्वी आयोजन

57

कोटमी येथे शिक्षण परिषदेचा उत्साहात यशस्वी आयोजन

एटापल्ली, दि. 18 मार्च 2026 :

पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत कोटमी केंद्राची शिक्षण परिषद जि. प. केंद्र शाळा कोटमी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मान. डॉ. प्रभाकर साखरे (केंद्रप्रमुख) होते, तर उद्घाटक म्हणून मान. दूधराम चापले (मूल्यवर्धन तालुका समन्वयक) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर परिपाठ सादर करण्यात आला.

प्रास्ताविकात डॉ. साखरे यांनी शिक्षण परिषदेचे महत्त्व स्पष्ट करत शिक्षकांना मार्गदर्शन केले. विविध तासिकांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम, पीएम श्री स्कूल, गणित-विज्ञान समृद्धी, HPC अंमलबजावणी, मूल्यवर्धन उपक्रम, निपुण भारत अभियान, तंबाखूमुक्त शाळा, शिष्यवृत्ती मार्गदर्शन व आनंददायी शनिवार यांसारख्या विषयांवर सखोल माहिती देण्यात आली.

खान अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जोडण्याचे प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व संबंधित कायद्यांची माहितीही देण्यात आली.

शंका-समाधान सत्रात शाळांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, आवश्यक कागदपत्रे, NOTECAM, VSK, MDM याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी नियमित उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप “वंदे मातरम” या गीताने झाला. शेवटी सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोभाटे सर यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री दुर्गे सर व श्री संजय मोहुर्ले सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Don`t copy text!