Home Breaking News जुन्या शिवसैनिकांची मुंबई महापालिकेत भावनिक भेट; राजकीय भिन्नता असली तरी मैत्री अबाधित

जुन्या शिवसैनिकांची मुंबई महापालिकेत भावनिक भेट; राजकीय भिन्नता असली तरी मैत्री अबाधित

77

 

जुन्या शिवसैनिकांची मुंबई महापालिकेत भावनिक भेट; राजकीय भिन्नता असली तरी मैत्री अबाधित

 

गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांचे सहकारी एकत्र; आठवणींना उजाळा

मुंबई :

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी घडलेल्या जुन्या शिवसैनिकांची मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज भावनिक भेट झाली. विविध पक्षांत विखुरलेले असले तरी या नेत्यांमधील जुने संबंध आणि मैत्रीचे नाते आजही तितकेच घट्ट असल्याचे या भेटीतून दिसून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी उपमहापौर संजय घाडी यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन करत तब्बल अर्धा तास राजकीय आणि सामाजिक आठवणींना उजाळा देण्यात आला.

या भेटीदरम्यान भाजप नेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचाही उल्लेख झाला. त्यांचे बंधू, मुंबई हाउसिंग बोर्डाचे उपाध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश दरेकर यांचीही यावेळी भेट घेण्यात आली.

पुढे प्रकाश दरेकर यांनी हेमंत गडकरी यांना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या भेटीस नेले. विविध राजकीय पक्षांत कार्यरत असले तरी हे सर्व नेते एकेकाळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय झाले होते.

कोकण आणि विदर्भातून आलेले हे जुने शिवसैनिक आज वेगवेगळ्या पक्षांत कार्यरत असले तरी त्यांच्यातील ऋणानुबंध आणि मैत्री कायम असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले. राजकीय भिन्नता असली तरी जुनी नाळ तुटलेली नाही, हेच या भेटीचे वैशिष्ट्य ठरले.

Don`t copy text!