Home गडचिरोली गडचिरोलीत पेट्रोल टंचाई; दुचाकीस्वारांच्या लांबच लांब रांगा, पुरवठा विस्कळीत; नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा

गडचिरोलीत पेट्रोल टंचाई; दुचाकीस्वारांच्या लांबच लांब रांगा, पुरवठा विस्कळीत; नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा

83

 

गडचिरोलीत पेट्रोल टंचाई; दुचाकीस्वारांच्या लांबच लांब रांगा, पुरवठा विस्कळीत; नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा

गडचिरोली, प्रतिनिधी :

शहरात पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा खंडित झाल्याने दुचाकीस्वारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही पेट्रोल मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून इंधनाचा पुरवठा सुरळीत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सकाळपासूनच नागरिक पेट्रोल पंपांवर रांगा लावत असून, अनेकांना कामावर जाण्यास उशीर होत आहे. विशेषतः विद्यार्थी व नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनीही पुरवठा लवकर सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Don`t copy text!