*उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी 31 मार्च पर्यंत प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ*
गडचिरोली, दि.24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक आता 31 मार्च, 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
स्पर्धकांकरिता विहित नमुन्यातील अर्जाचे नमुने जिल्हा माहिती कार्यालय, बॅरेक क्रमांक १, पोलिस मुख्यालयासमोर, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे तसेच dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधीतांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.





