Home Breaking News *“कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणात शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी”*

*“कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणात शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी”*

65

*“कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणात शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी”*

गडचिरोली दि. २५: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे विशेष दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील व परिसरातील एकूण १७२ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये विविध विभागांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सामान्य औषधवैद्यक (Gen Med) विभागातून सर्वाधिक १३६ रुग्णांची तपासणी झाली, तर शस्त्रक्रिया (Surgery) विभागात ११० रुग्णांनी नोंदणी केली. तसेच अस्थिव्यंग (Ortho) विभागात ७६, बालरोग (Paediatric) विभागात ३७ आणि नाक-कान-घसा (ENT) विभागात १३ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांनी एकापेक्षा जास्त आजारांसाठी तपासणी करून घेतल्याने विभागनिहाय आकडा मोठा असला तरी, एकूण १७२ पात्र लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाची पायपीट करावी लागू नये, याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी हे शिबिर स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या नियोजनाखाली डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा यांनी विशेष पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांचे नावनोंदणी व तपासणीचे काम सुलभ झाले आहे.

सदर शिबीरामध्ये डॉ. इंद्रजीत नागदेवते (भिषक), डॉ. सचिन कवाडकर (भिषक), डॉ. बाळू सहारे (अस्थीरोगतज्ञ), डॉ. मिथिलेश आत्राम (बालरोगतज्ञ), डॉ. मस्के (नेत्ररोगतज्ञ), डॉ. अजय कांबळे (ENT), डॉ. कमलेश परसवाणी (शल्य चिकित्सक) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ चमूने मोलाचे सहकार्य केले.

 

Don`t copy text!