Home गडचिरोली 09 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

09 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

44

 

09 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

 

* 03 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 06 असे एकूण 09 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

* महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 30 लाख रुपयांचे बक्षिस

* दोन माओवाद्यांनी एक स्वयंचलीत एके-47 व एक कार्बाईन शस्त्रांसह केले आत्मसमर्पण

* गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 132 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

* आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या माहितीवरून छत्तीसगड राज्यातून अग्निशस्त्रांसह इतर साहित्य जप्त

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

 

गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच कैद झालेली आहे. यासोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 805 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

 

आज दिनांक 31/03/2026 रोजी नऊ माओवादी सदस्य नामे 1) दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको (एसीएम – नॅशनल पार्क डॉक्टर टीम), वय 35 वर्षे, रा. आदवारा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), 2) रामजी अडमा पोटाम (एसीएम – सँड्रा दलम नॅशनल पार्क (कृषी विभाग)), वय 40 वर्षे, रा. मोठा पुसनार, ता. व जि. बिजापूर (छ.ग.),3) शांती वंजा वड्डे (एसीएम – इंद्रावती दलम), वय 35 वर्षे, रा. कवंडे, जि. बिजापूर (छ.ग.),4) मनकु मासो पोड¬ाम (सदस्य – सँड्रा दलम) वय 35 वर्षे, रा. डोक्के, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.),5) सरिता रामा वेलकम (सदस्य – नॅशनल पार्क मोपोस), वय 25 वर्षे, रा. गंगनपल्ली, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.),6) लखमी आयतु कुंजाम (सदस्य – मोपोस नॅशनल पार्क), वय 26 वर्षे, रा. गमपूर ता. व जि. बिजापूर (छ.ग.), 7) नंदे जोगा मडे (सदस्य – मोपोस, माड एरीया), वय 22 वर्षे रा. रामगंुडम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.), 8) राकेश कोरके मज्जी (सदस्य – सँड्रा दलम नॅशनल पार्क), वय 30 वर्षे, रा. तुमरगंुडा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.), 9) सुक्की बामी कुंजाम (सदस्य – पामेड एरीया दलम), वय 22 वर्षे, रा. बुसाम, तह. उसुर, जि. बीजापूर (छ.ग.), यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.

 

यापैकी शांती वंजा वड्डे हिने आपल्या एके 47 रायफल व 30 नग जिवंत काडतुसांसह तसेच सुक्की बामी कुंजाम हिने आपल्या कारबाईन रायफलसह आज रोजी आत्मसमर्पण केले आहे. तसेच त्यांनी पोस्टे कवंडे पासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवरील मौजा कुमनार जंगल परिसरात पुरुन ठेवलेल्या (डंप) माओवादी साहित्याची माहिती दिली होती. यावरुन मौजा कुमनार जंगल परिसरातून 01 – एके 47 रायफल, 03 – मॅगझीन, 57 जिवंत काडतूस, 03 – वॉकीटॉकी, 04- वॉकीटॉकी बॅटरी, 20 – पेनड्राईव्ह यासह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच उर्वरित सात माओवादी हे मागील पाच दिवसांपुर्वीच आत्मसमर्पण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलासमक्ष हजर होऊन यादरम्यान या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नॅशनल पार्क एरीयातील गंुडापुरी जंगल परिसरात हत्यारे, दारुगोळा व इतर साहित्य जमिनीमध्ये पुरुन ठेवले (डंप) असल्याचे सांगितले होते. यावरुन गडचिरोली पोलीस दल व छत्तीसगड पोलीसांमध्ये समन्वय साधण्यात येऊन संबंधित ठिकाणावरुन 7.62 एसएलआर – 02 नग, सिंगल शॉट – 01 नग, डेटोनेटर – 50 नग व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

 

विशेष म्हणजे दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 940 माओवादी सदस्यांनी 569 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.

 

 

 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

 

1) दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको

 दलममधील कार्यकाळ

* माहे जुलै 2005 मध्ये माटवाडा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे नोव्हेंबर 2005 पर्यंत काम केले.

* माहे नोव्हेंबर 2005 मध्ये गंगालुर दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत काम केले.

* सन 2019 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे जानेवारी 2020 पर्यंत काम केले

* माहे जानेवारी 2020 मध्ये गंगालुर एरीयातील डॉक्टर टीममध्ये बदली होऊन माहे डिसेंबर 2024 पर्यंत काम केले.

* माहे डिसेंबर 2024 मध्ये नॅशनल पार्क एरीयातील डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

2) रामजी अडमा पोटाम

 दलममधील कार्यकाळ

* सन 2005 मध्ये गंगालुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे फेब्राुवारी 2007 पर्यंत काम केले.

* माहे फेब्राुवारी 2007 मध्ये सीसीएम आनंद याचा गार्ड म्हणून बदली होऊन सन 2016 पर्यंत काम केले.

* सन 2016 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे एप्रिल 2019 पर्यंत काम केले.

* माहे एप्रिल 2019 मध्ये नॅशनल पार्क सँड्रा दलममध्ये बदली होऊन एसीएम पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

3) शांती वंजा वड्डे

 दलममधील कार्यकाळ

* सन 2016 मध्ये इंद्रावती दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2020 पर्यंत काम केले.

* सन 2020 मध्ये इंद्रावती दलममध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

4) मनकु मासो पोड¬ाम

 

 दलममधील कार्यकाळ

 

* माहे जानेवारी 2013 मध्ये मौजा गंुडापुरी आरपीसी अध्यक्ष म्हणून भरती होऊन सन 2023 पर्यंत काम केले.

* माहे एप्रिल 2023 मध्ये सँड्रा दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर राहुन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

5) सरिता रामा वेलकम

 दलममधील कार्यकाळ

* माहे नोव्हेंबर 2022 मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे एप्रिल 2023 पर्यंत काम केले.

* माहे एप्रिल 2023 मध्ये माड एरीयातील मोपोस येथे बदली होऊन डिव्हीसीएम बुदरी हिचे अंगरक्षक म्हणून माहे सप्टेंबर 2024 पर्यंत काम केले.

* माहे सप्टेंबर 2024 मध्ये नॅशनल पार्क मधील कृषी विभागमध्ये बदली होऊन सदस्य पदावर आजपोवेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

6) लखमी आयतु कुंजाम

 दलममधील कार्यकाळ

 

* माहे जून 2019 मध्ये गंगालुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑगस्ट 2019 पर्यंत काम केले.

* माहे ऑगस्ट 2019 मध्ये नॅशनल पार्क मोपोस येथे बदली होऊन सदस्य पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

7) नंदे जोगा मडे

 दलममधील कार्यकाळ

 

* माहे जून 2023 मध्ये माड एरीयातील मोपोसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जूलै 2024 पर्यंत काम केले.

* माहे जुलै 2024 मध्ये नॅशनल पार्क एरीयातील जनताना सरकार कृषी विभाग येथे बदली होऊन सदस्य पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

8) राकेश कोरके मज्जी

 दलममधील कार्यकाळ

 

* माहे जुलै 2022 मध्ये सँड्रा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑक्टोंबर 2022 पर्यंत काम केले.

* माहे ऑक्टोंबर 2022 मध्ये नॅशनल पार्क डीव्हीसीएम दिलीप वेळंजे याचा अंगरक्षक म्हणून बदली होऊन माहे एप्रिल 2024 पर्यंत कामे केले.

* माहे एप्रिल 2024 मध्ये सँड्रा दलममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम दिलीप वेळंजे यांचा अंगरक्षक म्हणून सदस्य पदावर आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 

9) सुक्की बामी कुंजाम

 दलममधील कार्यकाळ

* सन 2021 मध्ये पामेड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो काम केले.

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस

 

 महाराष्ट्र शासनाने दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने रामजी अडमा पोटाम याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने शांती वंजा वड्डे हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने मनकु मासो पोड¬ाम याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने सरिता रामा वेलकम हिच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने लखमी आयतु कुंजाम हिच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने नंदे जोगा मडे हिच्यावर 02लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने राकेश कोरके मज्जी याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने सुक्की बामी कुंजाम हिच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

 

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामजी अडमा पोटाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शांती वंजा वड्डे हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन मनकु मासो पोड¬ाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सरिता रामा वेलकम हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लखमी आयतु कुंजाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नंदे जोगा मडे हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन राकेश कोरके मज्जी याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सुक्की बामी कुंजाम हिला एकुण 5.25 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 04 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 166 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 पासून आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 09 माओवाद्यांसहित) एकूण 132 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे..

 

 

सदर कार्यक्रमाप्रसंगी उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 192 बटा. सिआरपीएफ श्री. परविंदर सिंग, स्टाफ ऑफीसर उप-महानिरीक्षक सिआरपीएफ कार्या. श्री. चंचल परवाना, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!