लॉकडाऊन काळात आंतरजिल्हा आपत्कालीन प्रवासासाठी  ई-पास लागणार:- पोलिस महासंचालक  संजय पांडे 

222

लॉकडाऊन काळात आंतरजिल्हा आपत्कालीन प्रवासासाठी  ई-पास लागणार:- पोलिस महासंचालक  संजय पांडे 

कोविडचा प्रसार महाराष्ट्रात पुन्हा वेगाने पसरत असताना प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. शुक्रवारी राज्य पोलिसांनी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी “अत्यंत आपत्कालीन परिस्थिती” साठी  ई-पास प्रणालीची व्यवस्था पुन्हा नव्याने सुरू केली आहे.

महाराष्ट्रचे पोलिस महासंचालक  संजय पांडे  म्हणाले आहेत का, ‘आज शुक्रवारपासून ई-पास सिस्टमची नव्याने रचना करण्यात आली आहे, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी नागरिकांनी त्याचा वापर करावा. लोकांना https: //covid19.mhpolice.in/ वर यासाठी अर्ज करावा लागेल. आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आणि त्यांच्या अत्यंत आपत्कालीन प्रवास करावा लागत आहे त्या प्रवासाचे योग्य ते कारण तिथे नमूद करावे लागेल’. E pass system सुविधा सुरू केली आहे.

ज्यांना ऑनलाईन ई-पास सिस्टमचा प्रवेश नाही, ते मिळविण्यासाठी तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्याला भेट देऊ शकतात. पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुम्हाला तो फॉर्म भरण्यास आणि ई-पास काढून देण्यास मदत करतील. अशी पूर्ण माहिती त्यांनी लॉकडाऊन च्या काळात प्रवास करणाऱ्या जनतेला सांगितली. तसेच हि सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.,