Home गडचिरोली संत नगरी शेंगाव येथे भाजपा विदर्भ विभागीय बैठक उत्साहात संपन्न गडचिरोली जिल्ह्याचे...

संत नगरी शेंगाव येथे भाजपा विदर्भ विभागीय बैठक उत्साहात संपन्न गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित

63

संत नगरी शेंगाव येथे भाजपा विदर्भ विभागीय बैठक उत्साहात संपन्न गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित

 

गडचिरोली: दि. २४ एप्रिल २०२६ :

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित जिल्हा वर्ग योजना कार्यशाळा संत नगरी शेंगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. खामगाव रोडवरील विघ्नहर्ता येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

 

या बैठकीस प्रदेश व विदर्भ पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुधारणा, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या धोरणांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले.

 

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा प्रभारी तथा आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हा प्रशिक्षण समिती संयोजक गोविंद सारडा, जिल्हा प्रशिक्षण समिती आयटी प्रमुख सुरज गुंडमवार, सहसंयोजक अनिल पोहनकर, जिल्हा सरचिटणीस सदानंद कुथे, तसेच गडचिरोली विधानसभा बीएलए-१ प्रमुख हरीष माकडे यांच्यासह इतर पदाधिकारी बैठकिला उपस्थित होते

 

बैठकीदरम्यान तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले. आगामी काळात पक्षाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

यावेळी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांचे कौशल्यवर्धन व संघटनात्मक बळकटी साध्य करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

ही बैठक संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, विदर्भात भाजपा अधिक बळकटपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Don`t copy text!