शासकीय विज्ञान महाविद्यालयात 100 बेडचे नवीन कोविड केअर सेंटर सुरू होणार

131

शासकीय विज्ञान महाविद्यालयात 100 बेडचे नवीन कोविड केअर सेंटर सुरू होणार

खास.अशोक नेते व आम. डॉ देवराव होळी यांनी केली कोविड सेंटरमधील सोयी- सुविधाची पाहणी

गडचिरोली :- दि. 24 एप्रिल
गडचिरोली जिल्ह्यामध्ये दररोज कोविड बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णासाठी बेड कमी पडत आहेत. या गंभीर बाबींची दखल घेत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने गडचिरोलीतील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

आज दि 24 एप्रिल 2021 रोजी खासदार अशोक नेते व आम.डॉ देवराव होळी यांनी शासकीय महाविद्यालयातील नवीन कोविड केअर सेंटर ला भेट दिली व तेथील व्यवस्था तथा सोयी -सुविधांची पाहणी केली. या कोविड सेंटर मधून बाधीत रुग्णाना योग्य आरोग्य सेवा देण्याचे सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख सुनील मेहर, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विकास वडेट्टीवार प्राचार्या चौधरी , डॉ कामडी, डॉ बिडकर, व अन्य अधिकारी उपस्थित होते.