Home Breaking News *भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या तक्रारींसाठी 21 मे रोजी जिल्हास्तरीय सभा*

*भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या तक्रारींसाठी 21 मे रोजी जिल्हास्तरीय सभा*

7

*भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या तक्रारींसाठी 21 मे रोजी जिल्हास्तरीय सभा*

 

*आवश्यक पुराव्यांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.18 : जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा गुरुवार, दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 

जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात आपली मते, तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कामकाजादरम्यान भ्रष्टाचार, गैरप्रकार किंवा अनियमितता झाल्याची तक्रार असल्यास संबंधित तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सभेमध्ये प्राप्त तक्रारींची समितीमार्फत सुनावणी करून संबंधित बाबींवर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असेही आवाहन सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.

Don`t copy text!